| चिरनेर | प्रतिनिधी |
उरण विधानसभेचे शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार प्रीतम म्हात्रे हे शेतकरी कामगार पक्षाच्या ताकदीवर निवडणूक लढले. मात्र, या निवडणुकीत प्रीतम म्हात्रे यांना निसटता पराभव पत्करावा लागला. उरण, पनवेल मतदारसंघात महायुतीच्या प्रचारासाठी, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री ओहोळ, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या सभा घ्याव्या लागल्या. दरम्यान, याविरुद्ध शेतकरी कामगार पक्षाने प्रचारासाठी कोणताही मोठा नेता किंवा स्टार प्रचारक न आणता, शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते जे.एम. म्हात्रे यांच्या नियोजनबद्ध मार्गदर्शनाखाली प्रीतम म्हात्रे हे एकटेच लढले.
शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस हे सर्व मोठे पक्ष एकत्र येऊन आले होते. प्रीतम म्हात्रे यांना भाजपने मते खाण्यासाठी उभे केले आहे. अशा प्रकारचा प्रचार केला गेला. परंतु, आता निकालानंतर तिसर्या क्रमांकावर गेलेल्या शिवसेनेच्या मतांमुळे नक्की कोणी कोणाला उभे केले होते, हे आता स्पष्ट झाले आहे. प्रीतम म्हात्रे यांच्यासोबत तरुणांची फौज रस्त्यावर उतरून, प्रचार यंत्रणा हातात घेऊन गावोगावी शिट्टी या निशाणीची ओळख देण्यात मग्न होती. वातावरण विरोधी असतानासुद्धा प्रीतम म्हात्रे यांनी लढण्याचे ठरवले. मात्र, थोडक्यात त्यांना पराभव पत्करावा लागला.
महाविकास आघाडीतील सर्व पक्ष शेतकरी कामगार पक्षाच्या विरुद्ध असतानासुद्धा युवा कार्यकर्त्यांच्या जोरावर आम्ही पक्षाची 87 हजार 248 मते मिळविली. यापुढे उरणमध्ये तरुणांच्या रोजगाराबाबत खूप काम करायचे आहे. बेरोजगारी, महिला क्षमीकरण यावर मला मुख्यत्वेकरून मोठे काम करायचे आहे. माझ्यासोबत असलेल्या सर्व युवा कार्यकर्त्यांना मी यापुढेही संपूर्णपणे ताकद देण्यासाठी, मी योग्य वेळी योग्य तो निर्णय घेईनच.
– प्रीतम म्हात्रे, उरण विधानसभा उमेदवार