स्व. महेश देशमुख पतसंस्थेला बँको पुरस्कार प्रदान

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
बँको या देशपातळीवरील नामांकित संस्थेकडून देशपातळीवर सहकारी बँकांचे मूल्यमापन करून उल्लेखनीय कामगिरी करणा-या बँकांना दिला जाणारा ब्ल्यू रिबन विजेतेपद पुरस्कार अलिबाग येथील स्व. महेश देशमुख नागरी सहकारी पतसंस्थेला महाबळेश्‍वर येथे प्रदान करण्यात आला. संस्थेचे चेअरमन अ‍ॅड परेश देशमुख यांनी हा पुरस्कार स्विकारला.

व्यवसाय, प्रतीसेवक उत्पादकता, संगणकीकरण, ऑडीट वर्ग, कर्जवसुली, वार्षिक व्यवसाय वृद्धी, उत्तम व्यवस्थापन आणि प्रशासन या निकषांच्या आधारे उत्कृष्ट कामगिरी करणार्‍या संस्थाना या पुरस्काराने गौरविण्यात येते. बँकोचे मुख्य संपादक अविनाश शिंत्रे, संचालक अशोक नाईक तसेच ठाणे जनता सहकारी बँकेचे चेअरमन शरद गांगल यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण महाबळेश्‍वर येथील एवरशाईन रिसॉर्ट अँड स्पा येथे करण्यात आले. यावेळी चेअरमन अ‍ॅड परेश देशमुख यांच्यासह व्हाईस चेअरमन वैभव पाटील, सेक्रेटरी महेंद्र पाटील, संचालक संदीप घरत, कर्मचारी प्रतिनिधी विनायक गिरकर आदी उपस्थित होते.

अ‍ॅड परेश देशमुख चेअरमन असलेल्या स्व. महेश देशमुख नागरी सहकारी पतसंस्थेला स्थापनेपासून प्रत्येक वर्षी ऑडीट मध्ये ङ्गअफ वर्ग प्राप्त झाला आहे. पतसंस्थेच्या माध्यमातून व्यवसायासोबतच विविध समाजोपयोगी उपक्रम राबविली जातात. यात शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत, चार वृत्तपत्र वाचनालय, परिसर सुशोभीकरण आदी उपक्रमांचा समावेश आहे.
बँकींग व्यवसाय करणे मुख्य उदेश अशी बाळगून, समाजकारणाचा ध्यास ठेवून, कार्यक्षेत्र वृद्धीचा दृष्टीकोन ठेवून सालाबादप्रमाणे आपल्या बँकेने सर्वांगिण कामगिरी केली आहे. संस्था स्थापनेपासून सतत ऑडीट वर्ग मअफ आणि काटेकोर कर्जवसूलीमुळे एन.पी.ए. 0% मिळवून बँकिंग क्षेत्रातील अडथळ्यांवर मात करून प्रगतीशील राहण्याची परंपरा ह्या वर्षीही जोपासली आहे. अहवाल सालात संस्थेला शासकीय लेखापरिक्षामध्ये 100 पैकी 88.00% गुण मिळालेले आहेत सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी संत रोहिदासनगर येथील संस्थेने तयार केलेल्य उद्यानाचे सुशोभीकरण करण्यात आले आहे.

सेवा क्षेत्रामध्ये व्यवसायवृद्धी, विकास, प्रसिद्धी यात बँकेचे कर्मचारी महत्त्वाची भूमिक पार पाडत आहेत. कर्मचारी बँकेचा चेहरा बनून ग्राहकांसाठी संपर्कस्थान असतात. हे कर्मचारी आमचा मोठा ठेवा आहेत आणि सतत ग्राहकांना कार्यक्षम सेवा देण्यासाठी आधारस्तंभ आहेत. सर्व सभासद, संचालक, ठेविदार, कर्जदार, हितचिंतक यांचे सहाय्य हा मोलाचा वाटा असल्याचे मत चेअरमन अ‍ॅड परेश देशमुख यांनी व्यक्त केला आहे. पुरस्कार मिळाल्याबद्दल चेअरमन अ‍ॅड परेश देशमुख यांच्यासह सर्व संचालक आणि कर्मचारी वर्गाचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे.

Exit mobile version