। अलिबाग । वार्ताहर ।
अलिबाग तालुक्यातील उसर येथील गेल इंडिया लिमिटेड यांच्यावतीने घोटवडे येथील रा.जि.प. मराठी शाळेतील विद्यार्थिनी व महिलांसाठी पाच दिवसीय मोफत स्वसंरक्षण स्वयंसिद्धा प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. याशिबिराचे मुख्य महाप्रबंधक अनुप गुप्ता, जितिन सक्सेना व शितल लाकरा यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली करण्यात आले. या प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन मुख्याध्यापिका रश्मी शिवलकर यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी या कार्यक्रमाला आंतरराष्ट्रीय खेळाडू तथा प्रिझम संस्थेच्या अध्यक्षा तपस्वी नंदकुमार गोंधळी, विकास स्वयंसहायता समूह घोटवडे बचत गटाच्या अध्यक्षा सरिता शिंदे, मनीषा दिलीप शिंदे, विनायक भोनकर, रवीना शिंदे, मधुमती ठाकूर, सुजाता खंडागळे, भारती लोहार, सौम्या ठाकूर, उज्वला सांदणकर, मेघा शिंदे, स्वयंसिद्धा प्रशिक्षिका प्रणाली तळेगावकर, मनीषा माने, दिव्या शिंदे, निकी बेंडे व प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.