। चणेरा । प्रतिनिधी ।
प्रभात महिला ग्रामसंघ व ग्रुप ग्रामपंचायत न्हावे यांच्या संयुक्त विद्यमानाने हळदीकुंकू समारंभ कार्यक्रम येथील राजिप मराठी शाळेत साजरा करण्यात आला.
या प्रसंगी प्रत्येक महिला सक्षम झाल्या पाहिजेत, तसेच त्या स्वतःच्या पायावर देखील उभ्या राहिल्या पाहिजेत, यासाठी त्यांना लागणारे सहकार्यासाठी ग्रामपंचायत तयार आहे, असे ग्रामसेवक वारघे म्हणाले आहेत. शासनाचे प्रत्येक महिलेला लखपती करण्याचे धोरण आहे. त्यासाठी प्रत्येकाने स्वतःचा किंवा गटाचा व्यवसाय करणे गरजेचे आहे. गटातील एका व्यक्तीने व्यवसायाला सुरुवात केली तर इतर नऊ महिलांनी तिला सहकार्य केले पाहिजे, असे नेहा पाटील म्हणाल्या आहेत. तर आपल्या बचत गटाची सामुहीक बैठक मासिक दिलेल्या दिवशी घेण्यात यावे व आपल्या समूहातील प्रत्येक महिला लखपती होईल याकडे लक्ष द्यावे. तसेच, त्यांना लागणारे प्रशिक्षण हे तालुका अभियान कक्षातर्फे मोफत देण्यात येईल, असे तालुका व्यवस्थापक अध्यक्ष खंदारे म्हणाले आहेत.
यावेळी, तालुका अभियान व्यवस्थापक अक्षय खंदारे व प्रभात समन्वयक नेहा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत सरपंच नितीन डबीर, उपसरपंच पांडुरंग कासकर, ग्रामसेवक दिपक चोरघे, सदस्य संध्या पाटील, पांडुरंग न्हावकर, प्रफुल झुरे, अश्विनी डबीर, रजनी पाटील, अंगणवाडी सेविका, बचत गटाच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.