अलिबाग | प्रतिनिधी |
गोठेघर गावचे रहिवासी,तळवडे वि वि का सेवा सोसायटीचे सलग ३५ वर्ष चेअरमन आणि परहुर ग्रामपंचायतीचे सलग १५ वर्ष सरपंचपद भूषविणारे शेकापक्षाचे जेष्ठ कार्यकर्ते श्री. दामोदर विठू पाटील यांचे गुरुवार दिनांक २२-०७-२०२१ रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. दामोदर पाटील हे आरडीसीसी बँक आणि नाबार्डच्या संयुक्त विद्यमाने आयोजित किसान क्रेडिट कार्डचे प्रथम कार्डधारक म्हणून सन्मानित व्यक्ती होते. त्यांच्या पश्चात १ मुलगा ४ मुली सून, जावई आणि नातवंडे असा परिवार आहे. त्यांचा दशक्रिया विधी शनिवार दिनांक ३१-०७-२०२१ रोजी सकाळी ९:०० वाजता कार्लेखिंड इथे होईल असे निकटवर्तीयांकडून सांगण्यात आले.






