। मुंबई । वृत्तसंस्था ।
शेअर मार्केटमध्ये मध्यंतरी सेन्सेक्स अन् निफ्टी यांची टक्केवारी घसरताना दिसली होती परंतु मंगळवारी इक्विटी मार्केटमध्ये जोरदार रिकव्हरी दिसून आली. आजही शेअर बाजाराची स्थिर सुरुवात झाली. सेन्सेक्स 209.34अंकांनी वाढून 58,198.64 वर सुरु झाला. दुसरीकडे, निफ्टी 2.8 अंकांच्या वाढीसह 17,120.40 वर सुरु झाला.
मंगळवारी इक्विटी मार्केटमध्ये जोरदार रिकव्हरी दिसून आली. ऑटो बँक आयटी, ऑईल अँड गॅस शेअर्समध्ये जोरदार खरेदीमुळे सेन्सेक्स-निफ्टी 1 टक्क्यांहून अधिक वाढीसह बंद झाले. शेवटी सेन्सेक्स 696.81 अंकांनी म्हणजेच 1.22 टक्क्यांनी वाढून 57,989.30 वर बंद झाला. दुसरीकडे, निफ्टी 197.90 अंकांच्या अर्थात 1.16 टक्क्यांच्या वाढीसह 17,315.50 वर बंद झाला.