| मुंबई | प्रतिनिधी |
मुंबईमध्ये 13 वर्षांच्या मुलावर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना मुलुंड परिसरामध्ये घडली आहे. कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी देत या मुलावर लैंगिक अत्याचार करण्यात आले. याप्रकरणी 50 वर्षांच्या व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेमुळे मुंलुंडमध्ये खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुलुंड परिसरात 13 वर्षीय मुलावर लैंगिक अत्याचार करण्यात आले. गेल्या सात महिन्यांपासून घराजवळील सार्वजनिक शौचालयात पीडित मुलावर लैंगिक अत्याचार सुरू होते. 50 वर्षीय नराधमाने हे घाणेरडे कृत्य केले आहे. अत्याचाराची तक्रार केल्यास मुलाला आणि त्याच्या परिवाराला जीवे मारण्याची धमकी आरोपी देत होता. त्यामुळे घाबरलेला मुलगा निमुटपणे हे अत्याचार सहन करत होता. या त्रासाला कंटाळुन शेवटी त्याने ही बाब कुटुंबीयांना सांगितली. याप्रकरणी त्यांनी तात्काळ मुलुंड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसानी आरोपी नराधमाला अटक केली आहे. अधिक तपास पोलीस करीत आहेत.