| नाशिक | प्रतिनिधी |
नाशिकमधून धक्कादायक घटना समोर आली आहे. एका 8 वर्षांच्या मुलावर लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे. पीडित मुलाचा मृतदेह इमारतीच्या डकमध्ये आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. ही घटना नाशिकच्या गंधर्व नगरी परिसरात घडली आहे.
प्राथमिक माहितीनुसार, पीडित अल्पवयीन मुलगा मूकबधीर होता. मूकबधीर असल्याचा फायदा संशयित आरोपीने घेत त्याच्यावर अत्याचार केले. अत्याचार केल्यानंतर आरोपीने मुलाची हत्या देखील केली. आरोपीने मुलावर अत्याचार केल्यानंतर त्याचा मृतदेह इमारतीच्या डकमध्ये टाकला, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. दरम्यान नाशिकच्या उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीचा शोध घेण्यासाठी नाशिक पोलिसांची 3 पथकं रवाना झाली आहेत. या घटनेचा अधिक तपास पोलीस करीत आहेत.