कळंबोली गावातील घटना; चोरटा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद
| पनवेल ग्रामीण | वार्ताहर |
कळंबोली गावातील काळभैरव मंदिरातील दान पेटी फोडल्याची घटना रविवारी (दि. 19) पहाटे घडली. चोरी करताना चोरटा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे कळंबोली पोलीस चोरट्याचा शोध घेत आहेत. मंदिरातील दान पेट्यावर डल्ला मारण्याचे काम अनेकदा चोरटे करतात. यामध्ये भुरट्या चोऱ्या करणाऱ्या चोरट्याचं प्रमाण अधिक असत. पनवेल परिसरात देखील या पूर्वी मंदिराच्या दान पेट्या फोडण्याचे काम चोरट्यानी केले आहे. वारंवार होत असलेल्या या प्रकारामुळे मंदिरात सीसीटीव्ही बसवण्याचे काम मंदिर प्रशासनाकडून करण्यात आले आहे. जे ने करून सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या दहशतीने दान पेट्या फोडण्याचे प्रमाण कमी होईल. मंदिर प्रशासनाचा या निर्णयामुळे चोऱ्या होण्याचे प्रकार कमी होतील असे अपेक्षित असताना कळंबोली कालभैरव मंदिरात झालेल्या चोरीमुळे चोरटे कशालाच जुमाणत नसल्याचे स्पष्ट झाले आहे.