| मुंबई | प्रतिनिधी |
अभिनेता सैफ अली खानवर 16 जानेवारी रोजी वांद्रे येथील त्याच्या राहत्या घरी चाकू हल्ला झाला होता. त्यानंतर सैफला मुंबईतील लीलावती रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. या हल्ल्यात सैफच्या मणक्याला गंभीर दुखापत झाली आहे. दरम्यान सैफ अली खानवर दोन गंभीर शस्त्रक्रिया पार पडल्या आहेत. आता त्याच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर त्याला आता रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. पाच दिवसांच्या उपचारांनंतर त्याला रुग्णालयातून सोडण्यात आले आहे.