| नवी मुंबई | प्रतिनीधी |
नवी मुंबई पोलीस दलात कार्यरत असलेल्या एका पोलीस उपनिरीक्षकाने पनवेलमध्ये राहणाऱ्या एका महिला पोलिसावर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे या पोलीस उपनिरीक्षकाने पीडित महिला पोलिसाचे अर्धनग्न अवस्थेतील फोटो काढून ते व्हायरल करण्याची धमकी देत तिच्यावर मागील पाच वर्षे लैंगिक अत्याचार केल्याचा तसेच तिचा जातीवाचक अपशब्द वापवरुन अपमान केल्याचा आरोप पीडित महिलेने केला आहे. त्यानुसार पनवेल तालुका पोलिसांनी पोलीस उपनिरीक्षकावर बलात्करासह ऍट्रोसिटी ऍक्ट नुसार गुन्हा दाखल केला आहे. या गुह्यात पोलीस उपनिरीक्षक कृष्णा कुटे आणि त्याची आई इंदुबाई कुटे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पनवेल तालुका पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.