| पेण | प्रतिनिधी |
शेतकरी कामगार पक्षाचा 76 वा वर्धापनदिन बुधवारी (दि. 2) श्री.क्षेत्र पाली येथे संपन्न होणार आहे. हा वर्धापन दिन यशस्वी करण्याची सर्वस्वी जबाबदारी जिल्हा परिषद सदस्य तथा आरडीसीसी बँकेचे व्हाईस चेअरमन सुरेश खैरे यांनी आपल्या खांदयावर घेतली आहे. वर्धापन दिनाच्या नियोजना संदर्भात कृषीवलशी बोलताना सुरेश खैरे यांनी सांगितले की, दिड एकर जागेत मंडप उभारण्यात येणार असून या सभामंडपामध्ये 25 हजार कार्यकर्त्यांची बसण्याची सोय करण्यात येणार आहे. तसेच येणाऱ्या कार्यकर्त्यांची पार्किंगची गैरसोय होऊ नये, म्हणून प्रत्येक तालुक्याला त्यांचा मार्ग ठरवून दिलेला आहे. त्या मार्गानेच कार्यकर्त्यांनी आपली वाहने पाली शहरामध्ये आणायची आहेत.
कर्जत, खालापूर, पनवेल, उरण या कार्यकर्त्यांनी खोपोली मार्गे आपली वाहने आणायची असून त्या मार्गावर ठरवलेल्या ठिकाणी वाहन पार्किंग करायचे आहे. तसेच पेण, अलिबाग, मुरूड या तालुक्यांनी नागोठणा मार्गे आपली वाहने आणायची आहेत. तर महाड, पोलादपूर, माणगाव, श्रीवर्धन, म्हसळा, तळा, रोहा या तालुक्याच्या कार्यकर्त्यांनी आपली वाहने निजामपूर मार्गे व सुतारवाडीच्या मार्गे पालीमध्ये आणायची आहेत. तसेच पार्कींग ही त्या -या भागामध्ये करून ठेवायची आहेत. जेणेकरून वाहतूक कोंडीचा प्रन उद्भवणार नाही आणि त्याचा त्रास कार्यकर्त्यांंना होणार नाही.
हा वर्धापनदिनाचा कार्यकम दि. 2 ऑगस्ट रोजी दुपारी 2 वाजता पाली येथील भक्तनिवास पार्किंग 1 ते दिड एकराच्या जागेमध्ये संपन्न होणार आहे. तसेच या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून युवराज संभाजीराजे छत्रपती हे उपस्थित राहणार असून शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस तथा आमदार जयंत पाटील हे मार्गदर्शन करणार आहेत.
महाराष्ट्रामध्ये शेतकरी कामगार पक्ष म्हणजे कार्यकर्त्ये निर्माण करण्याची जणू काही फॅक्टरीच असून या पक्षाचा वर्धापनदिन हा सर्वात मोठा कार्याक्रम असतो या कार्यक्रमातून वर्षभराची उर्जा कार्यकर्त्ये घेउन जातात. त्यामुळे वर्धापनदिनाच्या कार्यक्रमासाठी विचार ऐकण्यासाठी दरवर्षी जवळपास 25 हजार कार्यकर्त्ये आर्वजुन उपस्थित राहतात. त्यामुळे या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात 25 हजार कार्यकर्त्यांची बसण्याची सोय केली आहे. मात्र यावर्षी कार्यकर्ते वाढण्याची शक्यता असल्याचे सुरेश खैरे यांनी कृषीवलशी बोलताना सांगितले.