शकुंतला निळकर यांचे निधन

। चिरनेर वार्ताहर ।
अलिबाग तालुक्यातील देहेन येथील शकुंतला (माई) सदानंद निळकर यांचे शनिवार दिनांक 2 ऑक्टोबर रोजी निधन झाले. निधन समयी त्यांचे वय 61 होते. त्यांच्या निधनाबद्दल सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. अमरधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्यामागे पती, मुलगा चिराग निळकर असा परिवार आहे. त्यांची दशक्रिया विधी सोमवार, दि. 11 ऑक्टोबर रोजी उध्दर रामेश्‍वर येथे होईल. तर उत्तरकार्य विधी बुधवार दि. 13 ऑक्टोबर रोजी पनवेल येथील गुरूकृपा निवास स्थानी होईल. अशी माहिती सदानंद निळकर व चिराग निळकर यांनी दिली.

Exit mobile version