शारदा म्हात्रे यांचे निधन

। अलिबाग । प्रतिनिधी ।

अलिबाग तालुक्यातील धोकवडे येथील शेतकरी कामगार पक्षाच्या निष्ठावंत कार्यकर्त्या शारदा परशुराम म्हात्रे यांचे गुरुवारी (दि.6) अल्पशा आजारामुळे निधन झाले. निधनासमयी त्यांचे वय 86 वर्षे होेते. त्यांच्या पश्‍चात मुलगा, सुन, नातवंडे असा परिवार आहे. नथुराम म्हात्रे यांच्या त्या मातोश्री होतं. धोकवडे येथील राहत्या घरी गुरुवारी (दि.6) सकाळी चार वाजण्याच्या सुमारास त्यांचे निधन झाले. गावातील स्मशानभूमीमध्ये त्यांच्या पार्थिवावर सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी शेकापचे ज्येष्ठ नेते शंकरराव म्हात्रे आदी राजकीय, सामाजिक, क्रीडा, शैक्षणिक अशा वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवर मंडळी, धोकवडे ग्रामस्थ, महिला, नातेवाईकांनी उपस्थित राहून त्यांना श्रध्दांजली अर्पण केली. शारदा म्हात्रे याची दशक्रीया विधी 15 जून व उत्तरकार्य 16 जून रोजी होणार असल्याची माहिती म्हात्रे कुटूंबियांकडून देण्यात आली आहे.

Exit mobile version