शशिकांत कोठेकर यांना पत्नीशोक

| ठाणे | प्रतिनिधी |

ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाचे ज्येष्ठ सदस्य शशिकांत कोठेकर यांच्या पत्नी कादंबरी कोठेकर (50) यांचे अल्पशा आजाराने आज राहत्या घरी आकस्मिक निधन झाले. त्या पेटारा गावच्या रहिवासी होत्या. त्यांच्या पश्चात पती शशिकांत कोठेकर, मुलगा आर्यन, त्यांचे भाऊ आणि आई-वडील असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर आज सायंकाळी जवाहर बाग स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी आप्तेष्ट, मित्रपरिवार आणि पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. कोठेकर यांच्या आकस्मिक निधनाबद्दल उपस्थितांनी हळहळ व्यक्त करत कोठेकर कुटुंबीयांचे सांत्वन केले.

Exit mobile version