भयानक! ओळख लपविण्यासाठी तिचे तुकडे केले अन्….

। पुणे । प्रतिनिधी ।

पुण्यातील एका 18 ते 20 वर्षीय तरुणीची अत्यंत क्रूर पद्धतीने आरोपीने निर्घृण हत्या केल्याची घटना समोर आली आहे. आरोपीने तरुणीच डोकं, हात आणि पाय धडापासून वेगळे करून खराडी भागातील मुळा, मूठा नदी पात्रात तिचा मृतदेह फेकून दिल्याने संपूर्ण शहर हादरले आहे.

दरम्यान, आज्ञाताविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृत तरुणी 18 ते 20 वयोगटातील आहे. हत्येच कारण अद्याप अस्पष्ट आहे. पोलिसांनी अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे. तर मृत तरुणीची कोणालाही ओळख पटवता येऊ नये, यासाठी विकृत आरोपीने तरूणीच्या धडापासून तिचे हात-पाय आणि डोकं वेगळं केलं. धारदार शस्त्राच्या सहाय्याने आरोपीने तरूणीचे अवयव कापून तिचे धड नदीपात्रात फेकून दिले असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

Exit mobile version