| अलिबाग | प्रतिनिधी |
स्वातंत्र्य सैनिकांनी देशासाठी केलेल्या बलिदानाची माहिती आजच्या पिढीला समजावी यासाठी अलिबाग नगरपरिषदेच्या माध्यमातून स्वातंत्र्यसैनिकांच्या स्मरणार्थ अलिबागमध्ये शिलाफलक उभारण्यात आले आहे. या शिलाफलकाचे अनावरण पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या प्रमुख उपस्थित झाले.
यावेळी अलिबाग नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी तथा प्रशासक अंगाई साळुंखे, अलिबागचे तहसीलदार विक्रम पाटील, पोलीस निरीक्षक शिरीष पवार, जिल्हा प्रशासन अधिकारी श्याम पोशेट्टी, नायब तहसीलदार अजित टोळकर, नगरपरिषदेच्या उर्दू शाळेचे विद्यार्थी व जेएसएम महाविद्यालयाचे विद्यार्थी, नगरपरिषद कर्मचारी उपस्थित होते. ‘मेरी माटी मेरा देश’ या अभियानंतर्गत अलिबाग नगरपरिषदेच्या माध्यमातून अलिबाग मध्ये वेगवेगळे उपक्रम राबविण्यात आले. त्यामध्ये अलिबागमध्ये हिराकोट तलावानजीक असलेल्या उद्यानात स्वातंत्र्यसैनिकांच्या स्मरणार्थ शिलाफलक उभारले. नगरपरिषदेच्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत आहे.
अलिबागमध्ये शिलाफलकाचे अनावरण
