| अलिबाग | प्रतिनिधी |
स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत अलिबाग नगरपरिषदेच्यावतीने अलिबागमधील तीन माजी सैनिकांचा विशेष सत्कार करण्यात आला. माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांच्या प्रमुख उपस्थिती हा सोहळा मंगळवारी नगरपरिषदेच्या सभागृहात पार पडला. यावेळी मुख्याधिकारी तथा प्रशासन अधिकारी अंगाई सांळुखे, माजी उपनगराध्यक्षा ॲड. मानसी म्हात्रे आदी मान्यवरांसह नगरपरिषदेचे कर्मचारी व नागरिक उपस्थित हेते.
‘विरों को वंदन’ अंतर्गत हा कार्यक्रम अलिबागमध्ये घेण्यात आला. या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. आपल्या कुटुंबापासून कित्येक वर्षे दुर राहून देशसेवा करणाऱ्या सैनिकांप्रती आदर कायम राहावे, आजच्या पिढीपर्यंत देशसेवेचे महत्त्व पटवून देण्यासाठी हा कार्यक्रम अलिबाग नगरपरिषदेच्यावतीने घेण्यात आला.