। रत्नागिरी । प्रतिनिधी ।
इंग्रजांच्या काळापासून रत्नागिरीत सुरू असलेले प्रादेशिक मनोरुग्णालय कोल्हापुरातील जयसिंगपूर उदगाव येथे सुरू करण्याच्या हालचाली सुरू झालेल्या आहेत. आकृतिबंधानुसार मंजूर असलेली पदे उदगाव येधील 365 खाटांच्या प्रादेशिक मनोग्णालयासाठी वर्ग करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. यामुळे रत्नागिरीतील मनोरुग्णालय बंद होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सध्या या ठिकाणी 130 रुग्ण कार्यरत असून, अधिकारी, कर्मचार्यांची 50 टक्के पदे रिक्त आहेत. रत्नागिरीतील प्रादेशिक मनोग्णालय रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सातारा या जिल्ह्यांसाठी आहे. रुग्णालयास सुमारे 365 खाटांची मंजुरी आहे.
या रुग्णालयात एकूण 144 मंजूर पदे आहेत. यापैकी 50 टक्के पदे रिक्त आहेत. यात वर्ग 1 आणि चतुर्थश्रेणी, ब गट, क गट अशा पदांचा समावेश आहे. रुग्णांची संख्या अधिक असल्याने या रुग्णांची देखभाल करण्यासाठी आवश्यक असलेली कार्यालयीन पदे रिक्त आहेत. रुग्णांच्या सुरक्षेच्यादृष्टीने रुग्णालय प्रशासनाला कमी कर्मचार्यांमध्येच सध्या लक्ष ठेवावे लागत आहे. त्यामुळे कार्यरत असलेल्या कर्मचार्यांवर मोठा ताण येत आहे.
तसेच, कोल्हापूर, सांगली व सातारा आणि सीमाभागातील रुग्णांना व त्यांच्या नातेवाइकांना मनोरुग्णालयात पुणे किंवा रत्नागिरी येथे जावे लागते. यामुळे गेली अनेक वर्षे कोल्हापूरमध्ये मनोरुग्णालय व्हावे यासाठी प्रयत्न सुरू होते. पश्चिम महाराष्ट्रातील रुग्ण व नातेवाइकांची अनेक वर्षांपासूनची मागणी लक्षात घेत कोल्हापूरमधील शिरोळ तालुक्यातील उदगाव येथे रत्नागिरीच्या धर्तीवर 365 खाटांचे प्रादेशिक मनोग्णालय स्थापन करण्याबाबतच्या प्रस्तावास मंत्रिमंडळाची मान्यता मिळालेली आहे.