। रत्नागिरी । प्रतिनिधी ।
कुडाळ येथील एक अल्पवयीन मुलगी मंगळवारी (दि.3) बाजारात जाऊन येते असे सांगून गेली असता ती परत घरी आलीच नाही. याबाबत अल्पवयीन मुलीच्या पालकांनी तिचा शोध घेतला, परंतु ती सापडली नाही. याबाबत मुलीव्या पालकांनी सोमवारी (दि.9) कुडाळ पोलीस ठाण्यात माहिती दिली.
अपहरण झालेली मुलगी ही अल्पवयीन असल्याने या घटनेचे गांभीर्य ओळखून कुडाळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदुम यांनी तात्काळ दखल घेत अपहरण झालेल्या मुलीबाबत संशयीत आरोपीताबाबत गोपनीयरित्या व तांत्रिक विश्लेषणाधारे माहीती काढली. यानंतर आरोपी व अपहरण झालेली अल्पवयीन मुलगी ही रत्नागिरी येथे असल्याची माहीती मिळाली. यानंतर कुडाळ पोलीसांनी रत्नागिरी पोलीसांना याबाबत माहिती देऊन आरोपीच्या ठावठिकाण्याबाबत माहिती दिली. या माहितीच्या आधारे आरोपीला अपहरण केलेल्या मुलीसह ताब्यात घेऊन हा गुन्हा तात्काळ उघडकीस आणलेला आहे.