चोंढी येथील मारहाण प्रकरण भोवले
| अलिबाग | प्रतिनिधी |
काही महिन्यांपूर्वीच भाजपमधून शिंदे गटात पक्ष प्रवेश केलेले दिलीप भोईर उर्फ छोटम शेठ यांच्यासह 21 आरोपींना 12 वर्षांपूर्वीची चोंढी येथील मारामारी भोवली असून, त्यांना सात वर्षांची सक्तमजुरी आणि तीन हजार रुपयांचा दंड जिल्हा न्यायालयाने ठोठावला आहे. भोईरांवर हाफ मर्डर आणि मारामारी असे गुन्हे दाखल होते. एकूण 25 आरोपींपैकी चार आरोपींची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. याबाबतचा निकाल जिल्हा न्यायालयाने गुरुवारी दिला आहे. दरम्यान, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आधीच भोईरांना शिक्षा ठोठावण्यात आल्याने उमेदवारी करण्याचे त्यांचे मनसुबे धुळीस मिळाले असून, शिंदे गटासाठीदेखील हा मोठा दणका मानण्यात येत आहे. दिलीप भोईर यांच्यासह 21 आरोपींना सात वर्षांची सक्तमजुरी आणि प्रत्येकी तीन हजार रुपयांचा दंड न्यायालयाने ठोठावला आहे.





