| नवीन पनवेल | प्रतिनिधी |
स्पाय कॅमेऱ्याद्वारे स्नान करताना महिलांची व्हिडिओ घेणाऱ्या आरोपीच्या मोबाईलमध्ये पोलिसांना पन्नासहून अधिक व्हिडिओ सापडल्याचे समोर आले आहे. तर, दुसऱ्या मोबाईलमधील व्हिडिओ त्याने डिलीट केले आहेत. त्यादेखील प्राप्त करण्याची प्रोसेस सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
धानसर येथील रियांश फार्म हाऊसमध्ये बाथरूममध्ये लावलेल्या स्पाय कॅमेराद्वारे महिलांची व्हिडिओ काढणाऱ्या आरोपी मनोज चौधरी (रा. रांजणगाव, खारघर) याला तळोजा पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून दोन मोबाईल फोन जप्त करण्यात आले. एका मोबाईलमध्ये तब्बल 50 पेक्षा अधिक व्हिडिओ सापडल्याची माहिती समोर आली आहे. आरोपीला पनवेल न्यायालयात हजर केले असता 30 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या गुन्ह्यात आणखी कोणी सहभागी आहे का, याचा तपास तळोजा पोलीस करत आहेत.







