। मुंबई । प्रतिनिधी ।
राज्यात मर्सिडिजवरून राजकीय गदारोळ सुरू असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यांच्या मंत्र्यासह महाकुंभ मेळ्यात पोहोचले. त्यांनी त्रिवेणी संगमावर जाऊन स्नानही केले. गेल्या आठवड्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रयागराजला गेले होते, तर त्यानंतर लगेचच शिदेंनीही कुंभमेळ्याचा दौरा आखला. मात्र, त्यांच्या या शाही स्नानावरून शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे खा. संजय राऊत यांनी टीकास्त्र सोडले आहे. ते म्हणाले की, अडीच वर्षात मोठे पाप केले. पापाचा कडेलोट झाला म्हणूनच शिंदे गट प्रयागराजला गेले, असा राऊता यांनीनी शिंदेंवर हल्ला चढवला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना काही दिवसांपूर्वी महादजी शिंदे पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे प्रमुख शरद पवार यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला. त्यावरून राऊतांनी शिंदेंवरह टीकास्त्र सोडले होते. तसेच, अजित पवार यांना त्यांच्या मर्यादा माहीत आहे. मुख्यमंत्र्यांच्या अधिकाराचे पालन करतात. अजित पवार पाप धुवायला प्रयागराजला गेले नाहीत. राज्यातही पवित्र नद्या आहेत, हे त्यांना माहीत आहे. अडीच वर्षात मोठे पाप केले. पापाचा कडेलोट झाला म्हणून शिंदे गट प्रयागराजला गेले, असे टीकास्त्र राऊत यांनी सोडले आहे.