शिवसेना संपर्कप्रमुख हल्ला प्रकरण! दोघे चौकशीसाठी ताब्यात

। नेरळ । वार्ताहर ।
माथेरान शिवसेनेचे शहर संपर्क प्रमुख प्रसाद सावंत यांच्यावर 25 जून रोजी कर्जत येथे हल्ला झाला होता. त्यावेळी सावंत यांच्यासह त्यांच्या गाडीवरदेखील हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात जखमी झालेलले सावंत यांच्यावर एमजीएम रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दरम्यान, याप्रकरणी प्रसाद सावंत यांना महाराष्ट्र्र शासनाने पोलीस संरक्षण दिले आहे. सावंत यांच्यावरील हल्लाप्रकरणी कर्जत पोलिसांनी दोन हल्लेखोरांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. हल्ला झाला तेव्हापासून माथेरान शिवसेनेचे शहरप्रमुख फरार आहेत.

शिवसेना शाखेचा मोबाईलवर व्हटसअप ग्रुप असून शिवसेना पक्षातील काही सदस्यांनी कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांच्याबद्दल ग्रुपवर चर्चा चालू होती. त्यावेळी माथेरान येथील गौरव वाघेला यांनी एक पोस्ट टाकली की, आमदार महेंद्र थोरवे हे शिवसेनेतच आहेत आणि तुम्ही काही बोलू नका? यावरून बाचाबाची झाली होती. त्यावरून माथेरान शिवसेना शहर प्रमुख चंद्रकांत चौधरी आणि शहर संपर्क प्रमुख प्रसाद सावंत यांच्या भांडणे झाली. त्याबाबत माथेरान पोलीस येथे एकमेकाचे विरोधात तक्रारी दाखल झालेल्या आहेत. याप्रकरणी या सर्वांना पोलीस उपाधीक्षक विजय लगारे यांनी चर्चा करून शांतता राखण्याबाबत समज दिली होती.

त्यानंतर प्रसाद सावंत असे आमचे युनोव्हा गाडी क्र. एमएच 46/एमेड 4500 या गाडीवर चालक शिवाजी पाटील, रा. कर्जत याच्यासह मुंबई येथे दुपारी 02.15 वा. चे दरम्यान निघाले असता त्यांची गाडी रॉयल गार्डन जवळुन रोडवर जात असताना एका अनोळखी इसमाने गाडी थांबवून लाकडी दांडक्याने काचेवर मारण्यास सुरुवात केली होती. प्रसाद सावंत हे गाडीच्या खाली उतरले असताना 10 ते 12 अनोळखी इसमांनी लाकडी दांडक्यानी त्याचे हातावर, पायावर, पाठीवर मारहाण करून गंभीर दुखापत केली. त्यावेळी सोबत असलेले श्रेयस गायकवाड तसेच ड्रायव्हर शिवाजी पाटील असे युनोव्हा गाडीतुन प्रसाद सावंत यांना त्यांचे पासुन वाचविण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांनी श्रेयस गायकवाड यांना बाजुला करून सावंत यांना मारहाण करून युनोव्हा गाडीवर देखील लाकडी दांडक्याचे फटके मारून गाडीवर ढाडके मारून गाडीच्या काचा फोडुन नुकसान केले. या हल्ल्यात प्रसाद सावंत यांच्या पायाला आणि हाताला गंभीर जखमा आहेत. त्या दोन्ही ठिकाणी सर्जरी कराव्या लागणार आहेत, अशी माहिती एमजीएम रुग्णालयाच्या डॉक्टरांनी दिली आहे.

याप्रकरणी कर्जत पोलिसांनी दोन आरोपींना चोवीस तासांच्या आत पकडले असून, त्यांची चौकशी सुरु आहे. तर आणखी काही जण फरार असून, त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कर्जत पोलीस ठाण्याचे निरीक्षक के.डी. कोल्हे अधिक तपास करीत आहेत.

Exit mobile version