| पनवेल | वार्ताहर |
शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाच्या पनवेल शहर शाखेच्या वर्धापनदिनानिमित्त सत्यनारायण पूजा व हळदीकुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्ताने सत्यनारायण पूजेच्या कार्यक्रमास शिवसेना जिल्हा सल्लगार शिरीष बुटाला, माजी आ. बाळाराम पाटील, माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे, मा. पंचायत समिती सभापती काशिनाथ पाटील, महिला आघाडीच्या लीना गरड, मा. नगरसेवक अनिल भगत, दीपक निकम, अवचित राऊत, अजय बहिरा, नितीन पाटील, हेमराज म्हात्रे, निर्मला पाटील आदींसह अनेक विविध पक्षाचे मान्यवर यावेळी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे आयोजन शिवसेना पनवेल शहर प्रमुख प्रविण जाधव, मा.नगरसेवक अच्युत मनोरे, युवा सेनेचे पराग मोहिते, राकेश टेमघरे, कुणाल कुरघोडे, सन्नी टेमघरे, महिला आघाडी शहर संघटीका अर्चना कुलकर्णी, उज्वला गावडे, अश्विनी देसाई, रेश्मा कुरूप, अमित माळी, प्रशांत नरसाळे, संतोष तळेकर, शिवसैनिक उपस्थित होते. यावेळी लकी ड्रॉचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी 10 भाग्यवान विजेत्यांना कुलर, घड्याळ, पैठणी, कुकर, फ्राय पॅन असे 20 बक्षिसे देण्यात आली. तसेच, बोल मराठी मातीचे मुकेश उपाध्ये प्रस्तुत लोकगीते, कोळीगीते, मराठी चित्रपट गीते, नृत्य असा बहारदार कार्यक्रमाचे आयोजनसुद्धा याप्रसंगी करण्यात आले होते.