| उरण | वार्ताहर |
दुर्ग मावळा प्रतिष्ठानच्यावतीने दरवर्षी उरण तालुक्यातील द्रोणागिरी किल्ल्यावर शिवजन्मोत्सवाचे आयोजन केले जाते. तसेच, विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. दरवर्षीप्रमाणे यावर्षी दुर्ग मावळा प्रतिष्ठान उरण विभागाच्या वतीने 18 व 19 फेब्रुवारी रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
रविवारी (दि.18) सकाळी 8 ते 12 द्रोणागिरी गडाची सफाई आणि सजावट. दुपारी 2 ते 5 रक्तदान शिबीर (विमला तलाव), सायंकाळी 4 वा. गडावरील कुंडातील पाणी घेऊन खाली उतरने, सायकाळी 7 वा. महाराजांच्या मूर्तीचे अभ्यंगस्नान (विमला तलाव), सायंकाळी 8 ते 9.30 मशाल फेरी आणि दिपोत्सव (विमला तलाव).
सोमवारी (दि.19) सकाळी 7.00 वा. बाळ शिवाजी राजांचा पाळणा हलवणे (विमला तलाव), सकाळी 8. वा. शिवप्रतिमा पूजन (विमला तलाव), सकाळी 9 वा. प्रतिमा मिरवणूक, शिवराज्याभिषेक, दुर्ग पूजन, पोवाडा, व्याख्यान आणि मान्यवरांचे स्वागत. सायंकाळी 4.00 वा. गडावरून खाली उतरणे, सायंकाळी 5 वा. निरोप समारंभ असे विविध कार्यक्रमांचे आयोजन शिवजन्मोत्सव निमित्त आयोजित करण्यात आले आहे.