शिवशाही बसला अपघात

| सुकेळी | प्रतिनिधी |

मुंबई -गोवा महामार्गावर ऐनघर गावाच्या हद्दीमध्ये महाड आगाराची नाशिक बाजुकडुन महाडच्या दिशेकडे जाणारी शिवशाही बस डिवार्डरला धडकुन अपघात घडला. हा अपघात मंगळवार (दि.20 सांयकाळी 4.30 वाजण्याच्या सुमारास घडला. नाशिकवरुन महाडच्या बाजुकडे जाणारी बस ऐनघर गावाच्या हद्दीमध्ये आली असता समोरुन चुकीच्या बाजुने येणार्‍या वाहनाला वाचविण्यासाठी चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्यामुळे बस डिवार्डरला धडकली. या अपघातातील सर्व प्रवासी सुखरूप असून सर्व प्रवाशांना दुस-या बसने पुढे पाठविण्यात आले. तर बस चालक दत्तात्रय धोंडीबा दराडे (वय- 45) रा.मुंबई यांना किरकोळ जखम झाली असून त्यांच्यावर जिंदाल रुग्णालयात उपचार करण्यात आले. या अपघाताचा तपास नागोठणे पोलीस करीत आहेत.

Exit mobile version