ढोल ताशाच्या गजरात निघाली पालखी
| मुरुड जंजिरा | वार्ताहर |
मुरुडची पद्मदुर्ग जागर संवर्धन समिती व कोकण कडा मित्र मंडळ महाड आयोजित पदमदुर्ग जागर छत्रपती शिवरायांच्या पदमदुर्ग किल्ल्यावर मोठ्या उत्साहात साजरा झाला. शिवरायांनी जंजिरा किल्ल्यावर करडी नजर ठेवण्यासाठी खोल अरबी समुद्रात ऐतिहासिक पद्मदुर्ग किल्ला बांधला होता. मुरुड पद्मदुर्ग जागर संवर्धन समिती व कोकण कडा मित्रमंडळ यांनी 15 वर्षांपूर्वी जागर कार्यक्रम सुरु केला. छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी जय शिवाजी, हर हर महादेव, जय शंभुराजे, राजमाता जिजाऊ या घोषणांनी पद्मदुर्ग किल्ला परिसर दणाणून गेला होता. शिवकालीन मावळे हातात भाले व ढाल घेऊन गडावर अवतरले होते. संपूर्ण परिसर फुलांनी सजवण्यात आला होता. जणू शिवशाही अवतरली. गडाची स्वछता व पालापाचोळा याची योग्य विल्हेवाट मुरुडची पदमदुर्ग जागर संवर्धन समितीच्या मावळ्यांनी लावली होती. शेकडोच्या संख्येने लोक पदमदुर्ग किल्ल्यावर पोहचले होते. विविध घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला होता.
आज पद्मदुर्ग किल्लावर सकाळी शिवप्रेमी महेंद्र मोहिते सपत्नीक यांच्या हस्ते गड पूजन करण्यात आले शिवप्रतिमेचे विधिवत राजपुरोहित प्रकाश स्वामी जंगम यांच्या मंत्रउचारात केले गेले. शिव आरती करण्यात आली सोबतच किल्ल्यात कोटेश्वरी देवीचे मूळ स्थान आहे पूजन करण्यात आले. पदामदुर्ग जागर कार्यक्रमाची प्रस्तवना महाडचे शिवप्रेमी. सुरेश पवार, रोहित पवार, शेखर मामा, महेश मोरे, अनिकेत कदम, ज्ञानेश्वर काकडे, कैलास चव्हाण, कुंदेश वनारसे संतोष यादव पदमदुर्ग जागर संवर्धन समिती अध्यक्ष अशील ठाकूर साकेत वडके, आदेश दांडेकर, राहुल कासार, रुपेश जामकर, गणेश सतविडकर, संकेत आरकशी, मंगेश रणदिवे, सतेज विरुकुड, विरेंद्र गायकर, विजय वाणी, अच्युत चव्हाण, प्रदिप बागडे, संदिप घरत, सुनील शेळके, रुपेश दांडेकर पद्मदुर्ग जागर व गड संवर्धन समिती मुरुड, संकेत आरकशी व ग्रुप खारअंबोली आदिंसह शिवप्रेमी मावळे उपस्थित होते.
छत्रपती शिवरायांची प्रतिमापूजन झाल्यावर सजवलेल्या पालखीत शिवरायाना विराजमान करून वाजत गाजत पालखी गडाच्या बुरुजावरून फिरवण्यात आली. नंतर पालखी कोटेश्वरीचे मूळ स्थान असलेल्या देवीच्या देवळात दर्शनाला नेण्यात आली. सर्व शिवप्रेमींनी शिवगर्जना करत ढोल ताकशाच्या गजरात देवीच्या उधऊधव केला आणि नंतर बंधूनी व महिला लहान मुले यांनी शौर्याचे खेळ तलवारबाजी, भाले फेक, शिवशाहीची अठवण पर्यटकाना करून दिली पद्मदुर्ग जागर समिती मुरुड अध्यक्ष आशिल ठाकुर यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले कि, पडमदुर्ग किल्ला हा ढासळत चालला असून त्याचे संवर्धन पुरातत्व खात्याकडून केले जावे तसेच पदमदुर्ग किल्ला हा पर्यटकांना सहज पहाता यावा यासाठी येथे जेट्टी होणे खूप आवश्यक आहे.तसेच किल्ल्याची दुरुस्ती होण्यासाठी लोकप्रतिनिधी यांनी संसदेत आवाज उठवावा अशी मागणी यावेळी त्यांनी केली आहे.
नुकतेच रायगडचे खसदार सुनील तटकरे व आमदार महेंद्र दळवी साहेब यांनी पदमदुर्ग किल्ल्याचा पाहणी दौरा केला आणि गडाला कायमस्वरूपी जेटी व गडाच्या दुरुस्ती व पर्यटकांना येण्यासाठी अधिकृत बोट सेवा याचे नियोजन करण्यात आले. हे काम होणार असेल तर त्याचे श्रेय खरं कोकण कडा व मुरुडची पदमदुर्ग जागर संवर्धन समिती हिलाच जाते कारण गेली 16 वर्ष गडावर जागर करून शिवरायांच्या जलदुर्गाला लोकांसमोर आणले