शिवस्मारक जनतेसाठी खुले करावे- महेंद्र घरत

उरण | वार्ताहर |
जेएनपीटीने उभारलेले शिवस्मारक जनतेसाठी लवकरात लवकर खुले करण्यात यावे अशी मागणी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांनी जेएनपीटी चेअरमन संजय सेठी यांच्याकडे केली आहे. यावेळी व्हाईस चेअरमन यांनी येत्या 1 डिसेंबर रोजी जनतेसाठी खुले करण्याचे आश्‍वासन काँग्रेसच्या शिष्टमंडळाला दिले.
जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांनी दिलेल्या निवेदनात जासई येथे उभारण्यात आलेल्या शिवस्मारकाचे काम लॉक डाऊनपासून बंद आहे. शासनाने आता सर्व मंदिरे भक्तांच्या दर्शनासाठी खुले केले आहेत. उभारण्यात आलेले शिवस्मारक दासांसाठी मंदिरच आहे. तरी दासांच्या भावनेचा विचार करून शिवस्मारकाचे उर्वरित काम लवकरात लवकर पूर्ण करून जनतेसाठी खुले करण्यात यावे अशी मागणी केली. सदर निवेदन जिल्हा उपाध्यक्ष मिलिंद पाडगावकर, मच्छीमार नेते मार्तंड नाखवा, प्रभारी अकलाख शिलोत्री यांनी व्हाईस चेअरमन यांना दिले. यावेळी सदर शिवस्मारक येत्या 1 डिसेंबरला खुले करू असे आश्‍वासन काँग्रेसच्या शिष्टमंडळाला दिले.

Exit mobile version