। पाली । वार्ताहर ।
राबगाव ग्रामस्थांच्या वतीने भरविण्यात आलेल्या राबगाव प्रीमियर लीगचा शिवतेज फायटर्स संघ मानकरी ठरला, तर स्मित अॅड मित वॉरियर्सला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. धुलिवंदनाचे औचित्य साधून भरविण्यात आलेल्या या स्पर्धेत एकूण बारा संघ मालकांनी आपले संघ खेळविले होते.
यामध्ये सचिन भोईर, भोईर एटरप्राइजेस, रवींद्र भोईर श्रवण सुपरकिंग, सचिन भोईर साई कोल्ड्रींक, राहुल वाळंज फौजी लव्हर, दीपक भोईर श्री वरदायनी सप्लायर्स, वैभव भोईर मातोश्री बॉईज, उत्तम भोईर डोंबिवली वॉरियर्स, संकेत भोईर श्री वरदायिनी तरुण मंडळ, रवींद्र भोईर तनिष इंटरप्रायजेस, संतोष भोईर सिद्धिविनायक वॉरियर्स, बाबू घायले शिवतेज फायटर्स, निलेश भोईर स्मित अँड मीत रायडर्स या संघांनी सहभाग घेतला होता. यामध्ये तृतीय क्रमांक वरदायिनी तरुण मित्र मंडळ, चतुर्थ क्रमांक मातोश्री बॉयीज, सामनावीर सागर दिनकर भोईर, उत्कृष्ट फलंदाज राज संदेश भोईर, उत्कृष्ट गोलंदाज मनोज आत्माराम भोईर, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक स्वप्नील बबन सानप यांना मान्यवरांच्या हस्ते रोख पारितोषिक आणि आकर्षक चषक देऊन गौरविण्यात आले.