हळद कुंकू लावून फेकण्यात आला मृतदेह
। कोल्हापुर । वृत्तसंस्था ।
कोल्हापुरात सात वर्षाच्या मुलाच्या हत्येमुळे खळबळ उडाली आहे. सात वर्षाच्या या चिमुरड्याचे अपहरण झाल होते. अपहरण केल्यानंतर चिमुरड्याची हत्या करुन मृतदेह एका घराच्या मागे फेकून देण्यात आला. मृतदेहावर हळद कुंकू लावून टाकण्यात आल्याने हा नरबळीचा प्रकार असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. कोल्हापूरमधील कापशी या ठिकाणी हा प्रकार घडला असून संपुर्ण कोल्हापुर या घटनेने हादरले आहे.
आरव केशव केशरे असे या सात वर्षाच्या चिमुरड्याचे नाव आहे. घराबाहेर खेळत असताना दोन दिवसांपूर्वी आरवचं अपहरण झालं होत. यानंतर पोलिसांसोबतच गावकर्यांकडून आरवचा शोध घेतला जात होता. मात्र आरव कुठेच सापडला नाही. मंगळवारी पहाटे सहा वाजता गावापासून दूर असणार्या एका जुन्या घराच्या मागे आरवचा मृतदेह सापडला. यावेळी त्याच्या शरीरावर हळद कुंकू लावलेले होते. यामुळे हा नरबळीचा प्रकार असावा अशी शक्यता गावकर्यांकडून तसेच पोलिसांकडुन व्यक्त केली जात आहे. या घटनेचा अंधश्रद्धा निर्मुलन समितीकडुन निषेध करण्यात येत आहे. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.