धक्कादायक! लग्नाचे आमिष दाखवून केला बलात्कार

। रसायनी । प्रतिनिधी ।
रसायनी वावेघर येथील एका तरुणाने प्रेमसंबंध करत लग्नाचे आमिष दाखवून तरुणीसोबत शारिरीक संबंध ठेवल्याची घटना रसायनी पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, वावेघर येथील लक्ष्मण सिताराम चव्हाण (वय 26) याने गावातील एका तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून व त्याच्या मोबाईल फोनमधील फोटो प्रसारीत करण्याची धमकी देत मोहोपाडा येथील गुडलक लॉजवर तरुणीच्या इच्छेविरुद्ध शारिरीक अत्याचार केला.

याशिवाय मागील दिवाळी सणावेळी तरुणीस गुडलक लॉज येथे मारहाण करून वावेघर गावात आरोपी व फिर्यादी यांचे प्रेमसंबंध, शारिरीक संबंध ठेवल्या बाबतची बदनामी केली. अखेर आरोपीच्या जाचाला कंटाळून पिडित मुलीने घडलेला सारा प्रकार आई तसेच नातेवाईकांना सांगितला.

याप्रकरणी लक्ष्मण सिताराम चव्हाण यांच्याविरोधात रसायनी पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद झाली असून वरिष्ठ पोलीस निरीक्षक कैलास दादाभाऊ डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक धनाजी काळे अधिक तपास करीत आहेत.

Exit mobile version