| पनवेल | प्रतिनिधी |
अज्ञात महिलेचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्याने तालुक्यातील दहिवली गाव परिसरात खळबळ उडाली आहे. तालुक्यातील दहिवली गावाच्या परिसरात असणार्या टेक ग्लोबल लॉजिस्टीक कंपनीच्या मागील जागेत एका अंदाजे 30 ते 35 वयोगटातील महिलेचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आल्याने त्या गावचे पोलीस पाटील महेश पाटील यांनी तातडीने याबाबतची माहिती पनवेल तालुका पोलिसांनी कळविली. या घटनेची माहिती मिळताच पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे वपोनि अनिल पाटील यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचारी वर्गाने सदर ठिकाणी धाव घेवून तो मृतदेह ताब्यात घेतला आहे. सदर महिलेच्या अंगावर पिवळ्या रंगाचा वनपिस ड्रेस आहे. तसेच कानात झुमके, हातात पिवळ्या धातूच्या बांगड्या, पायात जोडवी आहे.
धक्कादायक! अज्ञात महिलेचा आढळला मृतदेह
