| खोपोली | वार्ताहर |
खालापूर पोलीस स्टेशनच्या अंतर्गत येणार्या वावोशी दूरक्षेत्राच्या कार्यक्षेत्रात अज्ञात चार चोरट्यांनी जवळपास 25 दुकानांचे शटर उघडून दुकानातील चिल्लर सह हजारो रुपयांची रोकड, एक लॅपटॉप व एक मोटारसायकल घेऊन पोबारा केला आहे.

चोरट्यांचा हा सर्व प्रताप सीसीटीव्ही कॅमेर्यामध्ये कैद झाले असले तरी पोलिसांना या चोरांबाबत काहीच सुगावा लागत नसल्याने चोरट्यांच्या कारवाईची भीती व्यापार्यांसह स्थानिकांच्या मनात बसली आहे. मागील दोन वर्षांतील तीन ते चार चोरीच्या घटनांचा उलगडा अद्यापपर्यंत पोलीसांना न करता आल्याने लोकांच्या मनात चोरांबद्दल भिंतीचे वातावरण निर्माण झाल्याचे पहायला मिळत आहे.

अज्ञात चार चोरट्याने वावोशी परिसरातील वावोशी फाटा, होराळे, डोणवत या ठिकाणच्या जवळपास 25 दुकानाचे शेटर उघडून दुकानातील चिल्लर, रोख रक्कम, सामान यावर डल्ला मारला आहे. काही दुकानांचे नुकसानही केले आहे. ही बाब पहाटेच्या वेळी भाजी व्यवसाय करणार्या लोकांच्या निदर्शनास आल्यावर त्यांनी याबाबतची माहिती स्थानिकांना दिली. स्थानिकांनी मग ही माहिती वावोशी दूरक्षेत्रातील पोलिसांना कळविल्यानंतर पोलिसांची झोप उडाली. एकाच रात्री आणि एकाच ठिकाणी जवळपास 25 दुकानांचे शेटर उघडून चोरी झाल्याची घटना समजतात खालापूरचे पोलीस निरीक्षक बाळा कुंभार हे आपल्या ताफ्यासह वावोशी पोलीस ठाण्यात दाखल झाले. मग त्यांनी सीसीटीव्ही कॅमेर्याच्या मार्फत चोरट्यांचा तपास करणे सुरुवात केली, मात्र बसवण्यात आलेले सीसीटीव्ही कॅमेरे हे रात्रीच्या अंधारात चोरट्यांचे चित्र व्यवस्थित टिपण्यात असमर्थ असल्याने पोलिसांना चोरट्यांचा काहीच तपास लागलेला नाही. मात्र या चोरीच्या प्रकरणात चार अज्ञात चोरटे असल्याचे काही सीसीटीव्ही कॅमेर्याच्या फुटेज मध्ये दिसून येत आहेत. मात्र पोलीस त्यांना ओळखतील असे त्यांचे चेहरे दिसत नसल्याने हे चोरटे पोलिसांच्या हाती लागतील याबाबत शंकाच व्यक्त केली जात आहे.

येथे मारला डल्ला
वावोशी फाटा येथील 1)वनिता चंद्रकांत इंगळे यांची गोंधळी खानावळ, 2)किशोर निषाद यांचे हेमा सुगंध मसाले अँड जनरल स्टोअर्स, 3)आदेश सुभाष आगिवले यांची श्री स्मरण मोबाईल शॉपी, 4) महेंद्र कोटक बँक, 5)शामराव वाडीले यांचे अनुष्का चना मार्ट अँड मोबाईल दुकान, 6)ओमप्रकाश देवाशी यांचे जगदंबा ट्रेडर्स किराणा दुकान, 7)संतोष धाक्रस यांचे जय श्री गणेश किराणा व जनरल स्टोअर्स, 8) शांताराम हडप यांचे साईनाथ आईस्क्रीम सेंटर, 9)निलेश पाटील यांचे जय लक्ष्मी किराणा अँड जनरल स्टोअर्स, 10)जनार्दन हडप यांचे फटाका व गिफ्ट शॉपी जनरल स्टोअर्स, 11)जयवंत पाटील यांची प्रचीती बियर शॉपी, 12)रामचंद्र पाटील यांच्या किराणा व भुसार मालाचे दुकान, 13)भिंगार्डे भाऊ यांचे सिमेंटचे दुकान, 14)अनिल इंगळे यांची पॅशन प्लस मोटार सायकल.
होराळे येथील 1)प्रभाकर पाटील यांचे जनरल स्टोअर्स, 2) रोहिदास पाटील यांच्या गाळ्यातील भाडोत्री दुकानदार.
डोणवत येथील 1)अनिल भापकर यांचे भापकर ट्रेडर्स, 2)सचिन लोनार यांचे कपड्यांचे दुकान, 3)किशोर थोरवे यांची निनाद बियर शॉप, 4)केतन देशमुख यांची कात्रज डेअरी, 5)अरविंद मोरे यांचे यश किराणा स्टोअर्स, 6)संतोष चिले यांचे समर्थ कृपा हॉटेल, 7)अनिल पाटील यांचे टेलरींग दुकान, 8)किशोर इंगळे यांचे रिकामे दुकान, 9)दीपक पाटील यांचे हॉटेल गायत्री गारवा.