| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
छत्रपती शिवाजी महाराजांबाबत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भाजप प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांच्या वादग्रस्त वक्तव्याविरोधात रायगडात संतापाची लाट उसळली आहे. सोमवारी अलिबाग शहरातील काँग्रेस आणि शिवसेनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले.
भाजप कार्यालयासमोर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी व सुधांशू त्रिवेदी यांच्या प्रतिमेला जोडेमारो आंदोलन करीत, त्यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला. जोडेमारो आंदोलन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख सुरेंद्र म्हात्रे यांच्या नेतृत्त्वाखाली करण्यात आले. यावेळी उपजिल्हाप्रमुख प्रशांत मिसाळ, अलिबाग तालुकाप्रमुख शंकर गुरव, शहरप्रमुख संदिप पालकर, डावली रांजनखार ग्रामपंचायत सरपंच हेमंत पाटील, अमिर ठाकूर, सतिश पाटील, सुरेश घरत, मारुती भगत यांच्यासह शिवसैनिक सहभागी झाले होते.
अलिबाग काँग्रेसतर्फे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी साहेब व भाजपाचे प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांच्याविरोधात निदर्शने.

महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल चुकीचे वक्तव्य करून महाराजांचा अपमान करणाऱ्या राज्यपाल भगतसिंग कोश्यारी साहेब व भाजपाचे प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांच्याविरुद्ध अलिबाग ठिकरूळ नाका येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ रायगड जिल्हा काँग्रेस व अलिबाग तालुका काँग्रेस कमिटीतर्फे निदर्शने करण्यात आली. कोशारी चले जाव, कोशारी हाय हाय, छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या.
यावेळी ऍड. प्रवीण ठाकूर, चिटणीस, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी, तालुकाध्यक्ष भास्कर चव्हाण,कविता ठाकूर, ऍड.उमेश ठाकूर, सुनील थळे, जगदीश कवळे, एस.एम.पाटील, महेंद्र महिमकर, संगिता माहिमकर, नीलम शिंदे, वसीम साखरकर, शहानवाज शेरखान, मन्सूर कादरी, समीर पल्लवकर, समद कुर, मुजफ्फर पल्लवकर, मुजाहिद लोगडे, कौस्तुभ पुनकर, ऍड.शैलेश मोकल, ऍड.गणेश पाटील, गजानन टिके, ऍड.सुजय घरत, संजय अनुभवणे, मेघनाथ पाटील, विश्वास म्हात्रे, प्रमोद पाटील, आशिष पाटील, मानस कुंटे, महेंद्र चौलकर, समीर ठाकूर, संदेश शिंदे, विकास पोरे व काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.