| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
भारतीय संघाचा फलंदाज श्रेयस अय्यर दुखापतीतून सावरला असून तो पुन्हा एकदा मैदानात उतरण्यासाठी सज्ज झाला आहे. 28 वर्षीय अय्यर सध्या संघासोबत अलूरमध्ये आहे. आशिया चषकपूर्वी भारताच्या येथे सहा दिवसांच्या सराव शिबिरात व्यस्त आहे. शिबिरादरम्यान बीसीसीआयशी विशेष संवाद साधला आणि आपल्या कारकिर्दीबाबत एक मोठा खुलासा केला आहे. दुखापतीच्या दिवसांतील त्याच्या संघर्षाची आठवण करून देताना, श्रेयस अय्यर म्हणाला की, खरं तर ही एक स्लिप डिस्क होती आणि वेदना पायापर्यंत जात होत्या. तो एक भयानक काळ होता. आता माझं करिअर संपले आहे असे वाटत होते. हे असह्य वेदना होते आणि मी काय करत आहे हे मला समजत नव्हते. वेदनापासून मुक्त होण्याचा एकमेव मार्ग शस्त्रक्रिया आहे.असे त्याने सांगितले.
मी अशा टप्प्यावर पोहोचलो होतो की आता मला ऑपरेशन करावे लागेल, पण ऑपरेशन करणे हा चांगला निर्णय होता आणि मी या निर्णयाने खूश आहे. ऑपरेशननंतर नॅशनल क्रिकेट अकादमीमध्ये घालवलेले दिवस त्यांच्यासाठी कठीण परीक्षेसारखे होते. फिजिओ आणि ट्रेनरला माझ्या पुनरागमनाची खात्री होती, पण त्यावेळी, मला खात्री नव्हती की मी चाचणी पास होईल की नाही.
श्रेयस अय्यर, क्रिकेटपटू
आगामी एकदिवसीय विश्वचषक डोळ्यासमोर ठेवून अय्यरला आशिया चषकामध्ये दमदार पुनरागमन करायचे आहे, परंतु त्याला फार पुढचा विचार करून स्वतःवर दबाव आणायचा नाही आणि वर्तमानात जगायचे आहे. तो म्हणाला, वर्तमानावर लक्ष केंद्रित करणे आणि माझी दिनचर्या योग्य ठेवणे माझ्यासाठी सध्या महत्त्वाचे आहे. पुढे काय होईल आणि भूतकाळात काय घडले याचा मला विचार करायचा नाही.असे त्याने सुचित केले.