| खांब-रोहा | वार्ताहर |
क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय रायगड व रायगड जिल्हा मिक्स बॉक्सिंग असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित, जिल्हास्तरीय मिक्स बॉक्सिंग स्पर्धा 2022 चे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत मेढे गावचा सुपुत्र श्रेयस गोवर्धने याने सुवर्णपदक पटकावले आहे.
रोहा रोठ खु. येथील जे.एम.राठी स्कूलच्या प्रांगणावर संपन्न करण्यात आलेल्या या स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष जयवंत मुंडे, अध्यक्ष रायगड मिक्स बॉक्सिंग असोसिएशन लीना डेव्हिड, प्रिंसिपल जे.एम.राठी इंग्लिश स्कूल रोहाचे दीपक माने, व्हाईस प्रिंसिपल राकेश म्हसकर, संस्थापक मिक्स बॉक्सिंग फेडरेशन प्रशांत मोहिते, खजिनदार राकेश पाटील, उपाध्यक्ष वृषाल गोवर्धने, सचिव रायगड मिक्स बॉक्सिंग असोसिएशन प्रशांत देशमुख, क्रीडा शिक्षक जे.एम.राठी इंग्लिश स्कूल रोहा आदी मान्यवरांसह किरण दाखवे, विनायक सकपाळ, मेघेश मोरे, रोहन शेवाळे, आदित्य पाटील, विशाल दलवे, आतेश साळवी, रंजित रेवाळे, सचिन प्रजापती, तन्वी मानकर, रंजना शिंदे, प्रणाली पाटील, पूजा रेवाळे, मंदार मोरे, गौरव शाह, करण यादव ऑफिशियल ग्रुप हे मान्यवर उपस्थित होते.