कालिका माता चषक स्पर्धेत श्री राधाकृष्ण क्रिकेट संघ वावे जांभूळवाडी विजेता

। खेड। प्रतिनिधी ।
श्री कालिका माता क्रिकेट मंडळ, वावे चिंचाट वाडी आयोजित कालिका माता चषक 2022 या क्रिकेट स्पर्धेचे वावे चिंचाटवाडी च्या क्रिडा नगरीत आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत पंधरागावातील एकूण 24 संघांनी सहभाग घेतला होता. ही स्पर्धा अंत्यत रंगतदार झाली. या स्पर्धेत प्रथम क्रमांक श्री राधाकृष्ण क्रिकेट संघ वावे जांभूळवाडी अ संघाने प्राप्त केला. द्वितीय क्रमांक श्री झोलाई माता मुसाड चांदेवाडी, तृतीय क्रमांक श्री कालिका माता क्रिकेट वावे चिंचाटवाडी, चतुर्थ क्रमांक धामनंद वगळाचा माल संघाने प्राप्त केला. या स्पर्धेत मालिकावीर रूपेश चांदे, उत्कृष्ट गोलंदाज राज उतेकर, उत्कृष्ट फलंदाज मदन चांदे, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक दीपक उतेकर, सामनावीर अंतिम सामना गणेश उतेकर, शिस्तबद्ध संघ शिवशंभो निवे संघ याना देण्यात आला.
या कार्यक्रम प्रसंगी कॅ. हरी कृष्णा उतेकर, अर्जुन उतेकर, चंद्रकांत उतेकर, अरुण उतेकर, उमेश मल्होत्रा, हेमंत उतेकर, राजेंद्र उतेकर, महेश उतेकर , विजय उतेकर, पांडुरंग पवार, सुर्यकांत उतेकर, जनार्दन उतेकर, सुभाष उतेकर, प्रदिप उतेकर, दिलीप उतेकर, रोहित उतेकर व सिद्धेश उतेकर, सर्व क्रिकेटप्रेमी, मान्यवर मंडळी यांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाचे उद्घाटन व बक्षीस वितरणाचे समालोचन निलेश उतेकर व राजेंद्र उतेकर यांनी केले.

Exit mobile version