श्रीकांत कवळे यांचा चेंढरे ग्रा.पं.तर्फे सत्कार

। अलिबाग । प्रतिनिधी ।

चेंढरे ग्रामपंचायतीच्यावतीने नायब तहसिलदार तथा साहित्यिक श्रीकांत कवळे यांचा साहित्य क्षेत्रातील योगदानाबद्दल सत्कार करण्यात आला.

यावेळी माजी जि.प.सदस्य संजय पाटील, आरसीएफचे वरिष्ठ अधिकारी शांताराम देशमुख, भालचंद्र देशपांडे, सरपंच स्वाती पाटील, सरपंच, अलिबाग पं.स.उपसभापती माजी जि.प. सभापती प्रियदर्शनी पाटील, जगदीश कवळे, अरुणा कवळे, प्रीत कवळे, अभय म्हात्रे, दळवी, पोपट, विविध क्षेत्रातील मान्यवर, नागरिक सदर कार्यक्रमास उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्नेहल आंबरे, यांनी केले. कवळे यांनी लिहिलेल्या आणि शारदा प्रकाशन ठाणे यांनी प्रकाशित केलेल्या अंतरंग मनाचं पहिल्याच पुस्तकाला विविध पुरस्कार प्राप्त झाले आहेत.

Exit mobile version