। श्रीवर्धन । प्रतिनिधी ।
नगर परिषद, पंचायत समित्या, जिल्हा परिषदेच्या निवडणुका जवळ आल्यामुळे विविध राजकीय पक्ष आता त्या दृष्टीने मोर्चेबांधणीला लागल्याचे दिसते. श्रीवर्धन तालुका ही याला अपवाद नाही. श्रीवर्धन तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सादिक राऊत यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच पक्ष कार्यकर्त्यांची सभा श्रीवर्धन येथे अबरार काळोखे यांच्या निवासस्थानी झाली.
त्यामध्ये नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. अध्यक्षपदी फहद लांब, प्रभाकर वाडकर,इम्तियाज कोकाटे,योगेश गंद्रे,अदिब मल्लाक,जाईद खलिफे,शबिस्ता अन्सारी, अरुण सावंत, हेमांगी चोगले, मुस्तफा बुरुड, मुजम्मिल चोगले (सर्व सदस्य) यांचा समावेश आहे. सभेमध्ये श्रीवर्धन नगर परिषदेच्या आगामी निवडणुकीमध्ये नगरसेवक पदासाठी जास्तीत जास्त उमेदवार उभे करण्याचे व नगराध्यक्ष पदासाठीही निवडणूक लढविण्याचे ठरविण्यात आले.