| फ्लोरिडा | वृत्तसंस्था |
भारतीय अंतराळवीर शुभांशु शुक्ला बुधवारी (दि.25) ड्रॅगन स्पेसक्राफ्टमधून अंतराळाकडे रवाना झाले आहेत. एक्सिओम मिशन 4 अंतर्गत हे यान अमेरिकेतील फ्लोरिडा येथील केनेडी स्पेस सेंटरमधून सोडण्यात आले आहे. या मोहिमेत शुभांशुंसोबत अमेरिका, पोलंड आणि हंगेरीचे अंतराळवीरही सहभागी झाले आहेत. उद्या हे यान आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचणार आहे. ही घटना भारतासाठी अनेक अर्थांनी ऐतिहासिक ठरणार आहे. कारण 1984 मध्ये राकेश शर्मा रशियन स्पेसक्राफ्टद्वारे अंतराळात गेले होते. तर शुभांशु शुक्ला हे अंतराळात जाणारे भारताचे पहिले अंतराळवीर ठरणार आहेत.
अंतराळवीरांना दिले जाणारे स्पेससूट हे केवळ कपडे नसतात, तर ते एक प्रकारचं चालतं-फिरतं अंतराळयानच असतं. अमेरिकेची अंतराळ संस्था नासा तयार करत असलेले स्पेससूट हे याचे उत्तम उदाहरण आहे. याची किंमत जवळपास 1 अब्ज डॉलर, म्हणजेच 8,355 कोटी रुपये आहे. हे सूट इतके महाग असतात, कारण ते -150 ते +120 पर्यंत तापमान सहन करू शकतात. अंतराळातील सूक्ष्म धुळीपासून ते घातक किरणांपर्यंत, अनेक धोके टाळण्यासाठी ते तयार केलेले आहेत. या स्पेससूटमध्ये ऑक्सिजन, तापमान नियंत्रण यंत्रणा, कार्बनडायऑक्साइड बाहेर टाकणारी प्रणाली, पिण्याचे पाणी, एअर कंडिशनिंग आणि अगदी इनबिल्ट टॉयलेटही असते. एकंदरच, या सूटमध्ये अंतराळवीरांचं संपूर्ण जग सामावलेलं असतं.
आपत्कालीन बॅकअपही सज्ज
अशा सूटमध्ये बॅकपॅक यंत्रणाही असते, जी आपत्कालीन प्रसंगी ऑक्सिजन पुरवते आणि कार्बनडायऑक्साइड बाहेर टाकते. जर काही बिघाड झाला, तर हे बॅकअप जीव वाचवू शकतात.
शुभांशुंचा प्रवास ऐतिहासिक ठरणार
या मोहिमेमुळे भारताचा अंतराळ क्षेत्रातील सहभाग आणखी वाढेल. शुभांशु शुक्ला यांनी गाठल्यावर भारत पहिल्यांदाच आपला अंतराळवीर पाठवण्याचा मान मिळवणार आहे.