| रसायनी | प्रतिनिधी |
रसायनीतील एमआयडीसी रोड येथील पराडे कॉर्नर येथे ‘पॅराडाईज एंटरटेनमेंट’ या डिजिटल जाहिरात सेवांच्या कंपनीचा शुभारंभ मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. ‘टर्निंग व्हिजन इनटू व्हिझबिलटी’ या ब्रीदवाक्यासह सुरू झालेल्या या उपक्रमातून बदलत्या जाहिरात क्षेत्राचे चित्र स्पष्ट झाले आहे.
आज पारंपरिक होर्डिंग्ज आणि छापील माध्यमांची पकड कमी होत असताना एलईडी स्क्रिनवरील डिजिटल जाहिराती व्यवसायांना ग्राहकांपर्यंत पोहोचविणारे प्रभावी साधन ठरत आहेत. पॅराडाईज एंटरटेनमेंटकडून योग्यवेळी या माध्यमाचा स्वीकार करण्यात आला असल्याचे उपस्थित उद्योग, प्रशासकीय आणि सामाजिक मान्यवरांनी नमूद केले. या उद्घाटन सोहळ्यास राज ग्रुप तुलसी होम मेकरचे डायरेक्टर अभिजीत पाटील व अस्मिता पाटील, रसायनी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय बांगर, थोरवे कन्स्ट्रक्शनचे संस्थापक गणेश थोरवे, सेटनेटचे संस्थापक मिथुन आणि मिताली साळुंखे आदी मान्यवरांसह विजय मिरकुटे, भालचंद्र थोरवे, रोहन भोईर, नितेश आंग्रे, पराग तेलवणे, संजय जोशी, राजेंद्र घोलप, सचिन मोरे, डॉ. श्रीकांत आणि संदीप आदी उपस्थित होते.
डिजिटल जाहिरात क्रांतीची नांदी
नवी मुंबई, पनवेल आणि रायगड परिसरातील व्यापाऱ्यांसाठी डिजिटल जाहिरात सेवा आता स्थानिक पातळीवर उपलब्ध होणार आहे. या माध्यमातून स्थानिक उद्योगांना नवी ऊर्जा आणि व्यावसायिक संधी मिळतील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. हा शुभारंभ केवळ नवा व्यवसाय उपक्रम नसून आगामी डिजिटल जाहिरात क्रांतीची नांदी असल्याचे कार्यक्रमात सामाजिक कार्यकर्ते भालचंद्र थोरवे यांनी बोलताना सांगितले.







