। मुंबई । वृत्तसंस्था ।
मुंबईतील कोरोना रुग्णांचा आकडा आता एक हजारांच्या खाली आल्याने आर्थिक राजधानी पुन्हा रुळावर येण्याची शक्यता वाढली आहे. त्यामुळे मुंबई लवकरच अनलॉक होण्याच्या वाटेवर आहे. यासंदर्भात पालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी दिलेल्या माहितीनुसार किशोरी पेडणेकर यांनी पत्रकार परिषदेत महत्वाचं वक्तव्य केले.
मुंबईत लवकरच अनलॉक
येत्या आठवड्यात मुंबईत १००% लसीकरण पूर्ण होईल. सध्या १५ ते १८ वयोगटातील प्रतिसाद कमी आहे, पण लवकरच त्याचीही पूर्तता होणार असल्याची माहिती महापौरांनी दिली. “फेब्रुवारी शेवट पर्यंत अनलॉक होण्याची शक्यता आहे असं आयुक्त म्हणाले. लवकरच सगळं चालू होणं गरजेचं आहे. त्यामुळे आम्ही सकारात्मक असल्याचं पेडणेकर म्हणाल्या. ‘अनलॉक’साठी मुख्यमंत्री आणि पूर्ण टीम आग्रही आहे, अशी माहिती त्यांनी दिली.