पेण पोलीस ठाण्यावर कोळी समाजाचा मूक मोर्चा

| पेण | प्रतिनिधी |

पेण कोळीवाडा येथील आई एकविरा देवीची चांदीची मूर्ती व पादुका मंदिरातुन चोरीला गेल्या आहेत. सात दिवस उलटून देखील चोरी करणार्‍याचा पत्ता लागत नसल्याने मंगळवारी (दि.14 ) पेण कोळी वाडयातील पुरूष व महिलांनी पेण पोलीस ठाण्यावर मूक मोर्चा काढून आपला निषेध नोंदविला तसेच निवेदनही सादर केले.

पेण पंच कमिटी कोळी समाज यांच्या मार्फत पेण पोलीस निरीक्षक देवेंद्र पोल यांना निवेदन देण्यात आले. निवेदनानुसार आई एकविरा देवीची चांदीची दीड फुटाची मूर्ती असून, असुन तीचे वजन 2 किलो 811 ग्रॅम तर चांदीच्या पादुकांचे वजन 661 ग्रॅम एवढे असून ही मुर्ती चोरीस गेल्याने कोळी, आगरी, मराठा, समाजाच्या भावना दुखावल्या आहेत. लवकरात लवकर चोराला पकडून योग्य तो शासन व्हा व आईची मुर्ती व पादुका परत मिळावी अशी विनंती करण्यात आली आहे. सदरील निवेदन हे प्रांत अधिकारी पेण, पालकमंत्री रायगड, उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना देखील देण्यात आले आहे.

आम्ही वेगवेगळया तीन टीम केल्या असून युध्दपातळीवर शोध मोहीम सुरु आहे. जास्तीत जास्त आधुनिक यंत्रणेचा वापर करत आहोत. सायबर ब्रँच आम्हाला मदत करीत आहेत. लवकरात लवकर चोराला पकडण्यात येईल.

देवेंद्र पोळ, पोलीस निरीक्षक
Exit mobile version