। गडब । वार्ताहर ।
लाडकी बहीण योजने पैसे राज्य सरकारकडून बँक खात्यात जमा झाले असून, ते काढण्यासाठी बँक ऑफ इंडिया गडब शाखेत महिलांची गर्दी उसळल्याचे चित्र आहे. लाडक्या बहिणींना रक्षाबंधनापूर्वीच दोन महिन्यांचे तीन हजार रूपये खात्यात मिळाले. पैसे काढण्यासाठी बहिणींनी बँकेमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत, तर काही महिलांचे लाडकी बहीण योजनेचे अर्ज मंजूर झाले; परंतु त्यांचे पैसे खात्यात जमा झाले नाहीत. बर्याचशा महिलांचे खात्याचे के.वाय.सी झालेले नाही, तर काही महिलांचे खाते आधारकार्डला जोडले गेले नाहीत, त्यामुळे केवायसी करध्सक, खाते आधार कार्डला जोडणे यासाठी बँकेत महिला गर्दी करत आहेत.
दरम्यान, बँक ऑफ इंडिया गडब शाखेत महिलांची गर्दी पाहता या ठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. केवाय सी करणे, बँकेचे खाते आधारकार्डला जोडणे, बँकेतून पैसे काढणे यासाठी महिला गर्दी करत आहेत. बँक कर्मचारी सहकार्य करीत असल्याचे बँक ऑफ इंडिया गडब शाखेचे शाखा व्यवस्थापक कालिदास माने यांनी सांगितले.