मनुस्मृती शिकवून गुलाम निर्माण होतील- राजरत्न आंबेडकर

| पाली/बेणसे | प्रतिनिधी |

लोकशाहीचे स्तंभ ढासळायला लागले असून, देशाची वाटचाल हुकूमशाहीच्या दिशेने होत आहे. अभ्यासक्रमात लहानपणापासूनच मनुस्मृती शिकवून एन्जॉय करणारे गुलाम निर्माण होतील, अशी चिंता भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पणतू राजरत्न आंबेडकर यांनी व्यक्त केली.

रायगड जिल्ह्यातील कर्जत येथे सालाबादप्रमाणे सर्व बहुजन बांधवांनी एकत्रित येऊन (दि.31) मे व (दि.1) जून अशा दोन दिवसीय भीम महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्ताने विविध वैचारीक, प्रबोधनात्मक कार्यक्रम घेण्यात आले. प्रमुख वक्ते भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे पणतू राजरत्न आंबेडकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. अभ्यासक्रमात, पाठ्यपुस्तकात मनुस्मृती आणण्याच्या भूमिकेवर राजरत्न आंबेडकर यांनी परखड मत मांडले आहे. आंबेडकर म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विधान आहे की, शिक्षण हे वर्णव्यवस्थेला, जातीयतेला उखडून फेकतील अशा लोकांचं झालं पाहिजे. जे लोक मनुस्मृती व वर्णव्यवस्था लागू करतील, ते लोक ही व्यवस्था टिकवून ठेवण्यासाठी ते आयुष्यभर प्रयत्न करतील. मनुस्मृती पाठ्यपुस्तकात लागू केली जाते, कारण मनुस्मृतीचे समर्थक या देशात तयार होतील. डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे की, गुलामाला गुलामीची जाणीव करून द्या म्हणजे ते बंड करून उठतील. आज मनुस्मृती लागू करून मनुस्मृतीचे समर्थक वाढवले जातात, आता धर्माधिष्टीत शिक्षण लहानपणापासूनच गुलामी एन्जॉय करणारी पिढी निर्माण करण्याचा हा प्रयत्न आहे. पूर्वीच्या शैक्षणिक क्षेत्रात आयएएस, आयपीएस, डॉक्टर, इंजिनिअर, वकील बाहेर पडायचे, आत्ताच्या शिक्षण प्रणालीतून आरएसएसचे कार्यकर्ते बाहेर पडतील.

या कार्यक्रमास रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे कर्जत तालुकाध्यक्ष हिरामण गायकवाड, जीवन गायकवाड, किशोर गायकवाड, अंकुश सुरवसे, विजय गायकवाड, गणेश कांबळे, अशोक गायकवाड, अलकाताई सोनवणे, सुरेखा कांबळे, नितीन सोनावणे, जगदीश शिंदे, निलेश गायकवाड, अक्षता गायकवाड, अध्यक्ष शैलेश पवार, दौलत ब्राम्हणे, के.के. गाडे, मनोहर ढोले, उमेश गायकवाड, सचिन भालेराव, सचिन गायकवाड, सुनील गायकवाड, गणपत गायकवाड, विश्‍वनाथ बडेकर आदींसह उत्सव कमिटीचे सर्व पदाधिकारी, भीम अनुयायी, बहुजन बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Exit mobile version