रोटरी क्लबची सामाजिक बांधिलकी

विद्यार्थिनी, शिक्षिकांसाठी बाथरुम, विश्रांतीगृहाची व्यवस्था

| रसायनी | वार्ताहर |

रोटरी क्लब ऑफ पाताळगंगाच्या माध्यमातून ग्लोबल ग्रॅड प्रकल्पांतर्गत जनता विद्यालय मोहोपाडा येथील विद्यार्थिनींसाठी दोन शौचालय व शिक्षक महिलांसाठी विश्रांती रुमची व्यवस्था करण्यात आली आहे. या कामाचे भूमिपूजन सोमवारी रोटरीचे माजी अध्यक्ष गणेश वर्तक यांच्या हस्ते करण्यात आले.

रोटरी क्लब ऑफ पाताळगंगाचे अध्यक्ष अमित शाह यांच्या कारकीर्दीतील हा शंभरावा उपक्रम असल्याचे समजते. यावेळी ग्रामसुधार मंडळाचे अध्यक्ष डॉ. पळणीटकर, व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष प्रदीप पाटील, माजी सरपंच संदीप मुंढे, माजी सभापती रमेश पाटील, इंग्रजी माध्यमाचे मुख्याध्यापक वारे सर, सीताराम म्हस्कर, सुदाम मु़ंढे, तुळशीदास पाटील, अनंता मुंढे, मनीष गायकवाड, रोटरी क्लब ऑफ पाताळगंगाचे अध्यक्ष अमित शाह, माजी अध्यक्ष गणेश वर्तक, गणेश काळे, बाळकृष्ण होणावळे, दीपक चौधरी, सुनील भोसले, क्लबचे सदस्य शशिकांत शानबाग, विजय पाटील, देवेंद्र महिंद्रीकर व सचिन थोरात आदी उपस्थित होते.

Exit mobile version