‘एमआयडीसीतील समस्या सोडवा’

। रसायनी । वार्ताहर ।
मोहोपाडा रसायनी रहिवासी वसाहतीमधील विविध समस्यांबाबत मनसे रसायनी शाखेच्या वतीने उपअभियंता सुधीर शिंदे यांना मनसे जिल्हा उपाध्यक्ष दीपक कांबळी यांच्यावतीने निवेदन देण्यात आले. मुख्यतः रसायनी परिसरातील सर्वंत्र रस्ते खराब झालेले आहेत. हे रस्ते त्वरित करण्यात यावेत, जे पथदिवे बंद आहेत, ते सुरू करण्यात यावेत.पावसाळा जवळ आला आहे, त्या अनुषंगाने गटारांची साफसफाई करणे. त्यावर त्वरित उपाययोजना करण्यात यावी, अशी मागणी मनसेच्या वतीने करण्यात आली आहे.

Exit mobile version