| उरण | वार्ताहर |
द्रोणागिरी शहरातील पाणी प्रश्नाबाबत माजी आमदार मनोहर भोईर यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना( ठाकरे)पक्षाच्या शिष्टमंडळाने सिडको अधिकारी यांची भेट घेतली व द्रोणागिरी शहरातील पाणी प्रश्नावर चर्चा केली. यामध्ये सेक्टर 47 प्लॉट 41 मध्ये वसलेल्या अक्षर इस्टोनिया हाउसिंग सोसायटी मधील बिकट झालेल्या पाणी प्रश्नावर लवकरात लवकर तोडगा काढून हा पाणी पुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली.याबाबत सिडको अधिकारी यांनी सकारात्मक भूमिका घेऊन हा पाणी प्रश्न सोडवण्याचे शिष्टमंडळाला आश्वासन दिले आहे. यावेळी सिडको वर द्रोणागिरी शहराप्रमाणे नव्याने वसत असलेल्या करंजाडे शहरातील पाणी प्रश्नासाठी मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी जगजीवन भोईर, किसन म्हात्रे, रवींद्र पाटील, जहुर पठाण व कार्यकर्ते उपस्थित होते.