| मुंबई | प्रतिनिधी |
विदर्भाचे सुपुत्र व मुंबई उच्च न्यायालयाचे वरिष्ठ न्यायमूर्ती अतुल चांदूरकर यांची गुरुवारी सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीपदी नियुक्ती करण्यात आली. सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने यासंदर्भात गेल्या सोमवारी केलेली शिफारस केंद्र सरकारद्वारे मंजूर करण्यात आली. न्या. चांदूरकर यांची दि. 21 जून 2013 रोजी मुंबई उच्च न्यायालयामध्ये अतिरिक्त न्यायमूर्तीपदी नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर 2 मार्च 2016 रोजी त्यांना सेवेत कायम करण्यात आले. त्यांनी पुणे येथील सेंट व्हिन्सेंट हायस्कूलमधून शालेय शिक्षण व नेस वाडिया महाविद्यालयातून पदवी शिक्षण पूर्ण केले तर, आयएलएस विधी महाविद्यालयातून एलएलबी पदवी प्राप्त केली आहे. त्यांनी दि. 21 जुलै 1988 पासून मुंबई येथील वरिष्ठ ॲड. बी. एन. नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली वकिली व्यवसायाला सुरुवात केली.